Raj Thackeray Pune : चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी काय करतील किंवा कधी काय मागणी करतील? याचा काही नेम नाही. असचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यासोबत पुण्यात  घडलं.  परभणीचे निशांत आणि विशाखा कमळू या जोडप्याने त्यांच्या चार वर्षांच्या चिमुरड्याचं नाव राज यांनी ठेवण्याची मागणी केली. पहिल्यांदा राज ठाकरे देखील गोंधळात पडले.  पण नंतर मुलाच्या पालकांच्या आग्रहानंतर राज ठाकरे यांनी चिमुरड्याचे नाव ठेवले. 


परभणीतचे हे दाम्पत्य  राज ठाकरे यांच्याकडूनच ठेवण्यासाठी थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले. बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज यांना गाठून चिमुरड्याचं नाव देण्याची विनंती केली. त्यानंतर  राज ठाकरे यांनी चिमुरड्याला यश हे नाव दिलं. निशांत हे गेली चौदा वर्षे राज यांचे निस्सीम चाहते तर आहेतच शिवाय मनसेचे पदाधिकारीही देखील आहे. 


आपल्या खास भाषणशैलीने लाखो चाहते आणि कार्यकर्त्यांच्या हृदयावर राज ठाकरे यांनी राज्य केले आहे. त्यांच्या कोणत्याही गोष्टीबाबत कार्यकर्त्यांना समर्थकांना नेहमीच उत्सुकता असते. अगदी अनौपचारिक अशा सभांनाही मोठी गर्दी होत असते. पण रोख-ठोक आणि थेट बाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज ठाकरे  यांना आपल्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरुन प्रेम मिळतं. या अगोदर सारेगमप (SRGMP) लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहोळ्याआधी स्पर्धकांनी मनसे प्रमुख 'राज ठाकरे' यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.


 



इतर महत्त्वाच्या बातम्या: