पिंपरी चिंचवड : बोफोर्स आणि वज्र यापेक्षा अधिक ताकदीची तोफ भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. भारतीय बनावटीची ही तोफ डीआरडीओने निर्मित केलेली आहे. ए-टॅग्स नावाने ही तोफ ओळखली जाईल. जी तब्बल 48 किलोमीटर अंतरावरील दुष्मणाचा वेध घेऊ शकते. हे एक वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचा दावा केला जातोय. ए-टॅग्स या तोफेची प्रात्यक्षिक चाचणी सुरू आहे, ती यशस्वी होताच ही तोफ भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. हीच भव्य तोफ सर्व सामान्यांना प्रत्यक्षात पाहता येणार आहे. पुण्याच्या देहूरोड येथील छावणीत प्रदर्शन सुरू आहे. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत आयोजित या प्रदर्शनात युद्धाच्या रणांगणात सामील झालेली आणि भविष्यातील युद्धासाठी सज्ज असलेली ही शस्त्र आहेत.  यात या ए-टॅग्स तोफेचा समावेश आहे. 


आझादी का अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराकडून विविध छावण्यात शस्त्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलंय. देहूच्या छावणीतील याच प्रदर्शनात 'ए-टॅग्स' ही तोफ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बोफोर्स, वज्र या तोफांपेक्षा ही अधिक शक्तिशाली तोफ भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.


डीआरडीओ कंपनीने विकसित केलेल्या या तोफेची प्रात्यक्षिक ही पार पडली. तेंव्हा या तोफेने तब्बल 48 किलोमीटर अंतरावरचा वेध घेतला. जगातील अव्वल तोफांमध्ये 'ए-टॅग्स'चा समावेश होईल असा दावा कंपनी कडून केला जातोय. देहूरोड लष्कर छावणीचे ब्रिगेडियर रविंद्र धनगड यांनी देखील ही तोफ लष्करासाठी महत्वाची असल्याचं नमूद केलं. या तोफेची काही तांत्रिक प्रात्यक्षिक सुरू आहेत. ती चाचणी यशस्वी झाली तर 'ए-टॅग्स' तोफ लष्करात दाखल होईल.


पुर्णतः भारतीय बनावटीची ही तोफ असल्यानं ही अभिमानाची बाब होईल. या वेतिरिक्त अन्य शस्त्र देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आलीत. जी भविष्यात भारतीय लष्करात दाखल होऊ शकतात. यावेतिरिक्त भारत-पाकिस्तान युद्धातील रणगाडे देखील प्रदर्शनात सामील आहेत. 19 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सर्व सामान्य नागरिकांना पाहता येणार आहे