ATF Rates Reduced of IOC:

  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या प्रभावामुळे अनेक देशांमधील विमान उड्डाणांवर निर्बंध असताना दुसरीकडे भारतीय हवाई क्षेत्रासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर  आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) ATF च्या (एव्हिएशन टर्बाइन फ्यूल) दरात कपात केली आहे. आयओसीने विमान इंधनाच्या दरात 3510.38 रुपये प्रति किलोलीटर कपात केली आहे. त्यानंतर आता इंधन दर  74,022.41 रुपये प्रति किलोलीटर इतके झाले आहेत. विमान इंधनाच्या दरात कपात झाल्याने विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


वेगवेगळ्या शहरातील ATF दर काय?


कपात केल्यानंतरचे नवे दर 16 डिसेंबरपासून लागू होणार आहे. घरगुती विमान कंपन्यांसाठी नवीन दर जाहीर झाले आहेत. दिल्लीमध्ये एटीएएफचा दर 74,022.41 रुपये प्रति किलोलीटर, कोलकातामध्ये 78,215.01 रुपये प्रति किलोलीटर, आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 72,448.20 रुपये प्रति किलोलीटर आणि  चेन्नईमध्ये 76,197.80 रुपये प्रति किलोलीटर इतका दर झाला आहे. विमान इंधन दरात दर 15 दिवसानंतर सुधारीत केले जातात. फेब्रुवारी महिन्यानंतर एटीएफच्या दरात पहिल्यांदा कपात करण्यात आली आहे. 
 
विमान इंधन दर कपातीचा तिकिट दरावर किती परिणाम?


भारतातील एअरलाइन्सच्या खर्चात ATF चा वाटा 30 ते 40 टक्के आहे.  वाढत्या किंवा घसरलेल्या इंधन किमतींचा परिणाम विमान प्रवास दरावरही होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच विमान कंपन्यांना तिकिट दर कमी करण्याच्या शक्यता कमी आहे. कोरोना महासाथीमुळे दीर्घकाळापासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान उड्डाणांवर निर्बंध आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना कोरोनामुळे आणखी तोटा सहन करावा लागला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांकडून विविध पर्यायांवर विचार केला जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha