Pune Bypoll election :  मविआचे बंडखोर उमेदवार(Chinchwad Bypoll Election) राहुल कलाटे (Rahul kalate)  यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. शिवाय त्यांना भाजपची फूस आहे असं बोललं जात आहे. शिवसैनिकांकडून तशी बॅनरबाजी केली गेली (pune bypoll election) आहे. त्यामुळे यावर राहुल कलाटे नेमकी काय भूमिका घेतील याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. 2019ला माझी हकालपट्टी (shiv sena) होणार अशा चर्चा होत्या मात्र अजूनपर्यंत झाली नाही, असं स्पष्टीकरण देत राहुल कलाटे यांनी या सगळ्या चर्चेला विराम दिला आहे. 


चिंचवडमध्ये त्यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर 'एका पक्षाची उमेदवारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून', असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या बॅनर संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, खरा शिवसैनिक असे बॅनर लावू शकत नाही. ही निवडणूक जनतेच्या मुख्य प्रश्नांवर झाली पाहिजे. मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न आहे. पण हे बॅनर कोणी लावलेत याची ही माहिती घेत आहे.


शिवसेनेतून हकालपट्टी होणार?


पोटनिवडणुकीचा अर्ज मागे न घेतल्यामुळे सचिन आहिरांनी राहुल कलाटेंवर निशाणा साधला होता. बंडखोर राहुल कलाटे गटप्रमुख, नगरसेवक होते. यापुढे त्यांचा पक्षाशी काही संबंध राहणार नाही, असं सचिन अहिर म्हणाले होते. त्यावरदेखील राहुल कलाटेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मी 2019 मध्ये ही विधानसभा निवडणूक लढलो. तेव्हा ही शिवसेनेकडून कारवाई होईल, असं बोललं जात होतं. मात्र नेत्यांनाही लक्षात येत असेल की. माझ्यावर अन्याय होतोय. ही भावना तेव्हाही जाणवली होती, त्यामुळेच तेव्हा देखील माझ्यावर कारवाई झाली नव्हती. पण आता काय कारवाई करतायेत मी ही लक्ष देतोय. 


अजित पवारांना सडेतोड उत्तर


मी अजित पवारांकडे आणि महाविकासआघाडीकडेच उमेदवारी मागत होतो. त्यामुळं दादांचे काय संकेत असतील, हे त्यांनाच विचारावं लागेल. मी बाकी कोणत्याही नेत्याला कधीच भेटायला गेलो नाही. मी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडेच गेलो होतो. इतर नेत्यांकडे गेलो असतो तर मीडियाने ठेवलेल्या ट्रॅपमध्ये आलोच असतो, असं म्हणत त्यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. अजित पवारांनी राहुल कलाटेंच्या बंडखोरीमागे मोठा मास्टरमाईंट असल्याचं म्हणाले होते. त्यावर राहुल कलाटेंनी उत्तर दिलं आहे.