पुणे: एकीकडे राजकारणी वेगवेगळ्या शक्कल लढवून जमीन हडप करताना दिसतात. घोटाळे समोर येतात. मात्र पुण्यातल्या कचरावेचक कामगार असलेल्या या अंजू माने यांनी या सगळ्या राजकारण्यांना थोडा विचार करायला भाग पाडलंय. त्याचं कारण म्हणजे पुण्यातील कचरा वेचक कामगार असलेल्या अंजू माने (Swach Worker Anju Mane) यांना कचरा वेचताना १० लाख पेक्षा जास्त पैसे असलेली एक बैग सापडली मात्र कसलाही मोह न करता त्यांनी पैसे घामेघूम झालेल्या पैशाच्या शोधात असलेल्या व्यक्तीला थेट परत केली. स्वच्छ संस्थेत या अंजू (Swach Worker Anju Mane) काम करतात त्याच्या तीन पिढ्या हेच काम करत आहेत. त्यांच्या प्रामाणिक पणाच आज कौतुक होतंय.(Swach Worker Anju Mane)
पुण्यातील सदाशिव पेठेत अंजू माने (Swach Worker Anju Mane)सकाळी कचरा उचलण्यासाठी जातात. काल त्या कचरा चुलण्यासाठी गेल्या असता त्यांना ती बॅग सापडली. ती बॅग एका डिलिव्हरी बॉयची होती. त्याला ती बॅंग आणि त्यातले पैसे मालकाला नेऊन द्यायचे होते. पैसे हरवले म्हणून तो भिरभिर फिरत होता त्यावेळी त्या महिलेने त्याला विचारलं आणि ती बॅंग त्याचीच आहे याची खात्री केली. त्यानंतर ती बॅग त्या व्यक्तीला परत केली. त्या व्यक्तीने अंजू यांना बक्षिस म्हणून 600 रुपये दिले.
Swach Worker Anju Mane: नेमकं काय घडलं?
स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात २० नोव्हेंबर रोजी देखील सकाळी ७ वाजल्यापासून दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. गोळा केलेला कचरा फिडर पॉईंटला आणताना अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही अशाच औषधाच्या बॅग मिळाल्याचा अनुभव अंजू यांना होता म्हणून तशीच कोणाची बॅग असेल असा विचार करून त्यांनी ती बॅग फीडर पॉइंटला सुरक्षित ठेवली. पण बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेली जवळपास २० वर्षे या भागात काम करत असल्यामुळे अंजू परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील सर्वांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घामेघूम अवस्थेत असलेल्या काहीतरी शोधत दिसला आणि त्या लोकांनी त्याला जाऊन विचारलं अन् पैसे परत केले. त्यानंतर त्या डिलीव्हरी बॉयने सुटकेचा निश्वास सोडला.
अंजू माने यांना तीन मुली एक मुलगा आहे. तिघींनाही चांगलं शिक्षण दिलं आहे. मुलगादेखील मेडीकल लाईनमध्ये कामाला आहे. 2007 पासून स्वच्छ संस्थेसोबच काम करत आहे. त्यांचे पती बाळासाहेब माने हे देखील त्यांना कामात मदत करतात. दोघे मिळून महिन्याला 8 हजार मिळतात. वडिल रिक्षा चालवायचं काम करतायचे मात्र आता अंजू यांना ते मदत करतात.