पुणे : चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरुन एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील बाणेरमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉप जनळ दोन तरुण टपरीवर चहा पित होते. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या आरोपीला त्यांचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.

क्षुल्लक कारणावरुन चिडलेल्या आरोपीने दोघांवर कुकरीने वार केल्याची माहिती आहे. हल्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघंही तरुणी इंदिरा वसाहत परिसरात राहत होते.

घटनेनंतर आरोपी हल्लेखोर पसार झाला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.