भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर पुण्यात गुन्हा
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 17 Sep 2017 01:22 PM (IST)
संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम 420, 406, 465, 467, 468 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
पुणे : प्रसिद्ध उद्योजक आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून देण्यात आलेली सतरा एकर जमीन बेकायदा बळकावल्याचा आरोप काकडेंवर आहे. संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम 420, 406, 465, 467, 468 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पुण्यातील वारजे पोलिस स्टेशनमधे गुन्हा नोंदवण्यात आला. पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून सतरा एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन अवैधरित्या बळकावल्याच्या आरोप काकडेंसह चौघांवर आहे. न्यू कोपरे गावचे ग्रामस्थ दिलीप मोरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.