Pune Crime News: प्रियकर रात्री जेवायला लवकर न आल्याने एका महिलेने तिच्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-chinchwad) मोशी परिसरात उघडकीस आली आहे. सुलोचना नामदेव लेकुरवाड असं 30 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. ती मुळची लातूरची आहे.
सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापुर्वी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचं कारँ समोर आलं नव्हतं. मात्र त्यानंतर कामाच्या शोधात सुलोचना पुण्यात स्थायिक झाली. पुण्यात सगळीकडे कामाच्या शोधात होती. काही दिवसांनी त्यांनी घरकाम आणि स्वयांपाक करुन उदर्निवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या रोज सकाळी संध्याकाळी कामाला जात असे. त्यांना चार मुली देखील आहेत. चारही मुली गावात शिक्षण घेत आहे.
या कामादरम्यान सुलोचना यांची एका व्यक्तीशी ओळख झाली. त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली. मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे मोशी परिसरात राहत होते. दोघेही वेगळ्या ठिकाणी राहत होते. मात्र जेवायला सोबत भेटायचे. सुलोचना यांनी स्वयंपाक केला मात्र प्रियकर जेवायला लवकर आला नाही. वाट बघताना त्यांना संताप अनावर झाला. याच कारणामुळे सुलोचना यांनी आत्महत्या केली असावी , असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र आत्महत्येचे मुळ कारण अजुनही स्पष्ट झालं नाही आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
सध्या आत्महत्येचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. नागरिकांमध्ये नैराश्य निर्माण झालं आहे. सुरु असलेल्या स्पर्धेच्या युगात सगळ्यांनी तुलना करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. क्षृल्लक कारणासाठी लोक आत्महत्या करतानाचे प्रकरणं रोज पुढे येत आहे. माणसांची सहनशक्ती संपल्याचं चित्र आहे. स्पर्धेमुळे अनेकांमध्ये नैराश्य आणि न्यूनगंड निर्माण झालं आहे. त्याचबरोबर विवाहबाह्य प्रेमसंबंधाचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे अनेकदा अशी प्रकरणं समोर येत आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.