Pune Agriculture News: यंदा पुणे जिल्ह्यात भरगोस पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यातील खरीपाच्या सरासरी 1 लाख 95 हजार 710 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आजअखेर 73 हजार 808 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून पेरणीचे प्रमाण सरासरीच्या 37 टक्के आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.


यंदा पेरणीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध असल्याने सध्या योग्य प्रमाणात पेरणी झाली आहे. बाजरीचे सुमारे 2 हजार 600 क्विंटल, मका- 2 हजार 400, भात- 22 हजार, तूर- 130, वाटाणा- 600, भुईमूग- 450 क्विंटल तर सोयाबीनचे 3 हजार 600 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे बळीराजाला पोषक वातावरणासह बियाणे देखील उपलब्ध होत आहे. 


पुणे जिल्ह्यातील तालुक्यात पेरणी उत्तम झाली आहे. एकूण 37 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात
हवेली- 821 हे. (4 हजार 906 हे.), मुळशी- 414 (8 हजार 545), भोर- 4 हजार 965 (17 हजार 465), मावळ- 534 (12 हजार 990), वेल्हे- 381 (5 हजार 892), जुन्नर- 11 हजार 931 (29 हजार 777), खेड- 15 हजार 921 (23 हजार 399), आंबेगाव- 7 हजार 606 (16 हजार 14), शिरुर- 12 हजार 236 (33 हजार 700),  बारामती- 8 हजार 274 (11 हजार 1), इंदापूर- 3 हजार 836 (8 हजार 414), दौण्ड- 1 हजार 935 (4 हजार 388), पुरंदर- 4 हजार 951 हे. (19 हजार 219 हे.) पेरणी झाली आहे.



यंदा पुणे जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडला आहे. गेले तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.त्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडला. पुरेसा पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. महाराष्ट्रात काही शहरांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. मात्र पुणे जिल्हात कमी प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आनंदी आहे.