पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुणे  (Pune Weather Update) आणि परिसरात उन्हाच्या झळा (Weather Forecast)  जाणवत आहे. कमाल तापमान 38.9 अंशांवर आहे सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यात आणखी 2-3 अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला 


भारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी  म्हटले आहे की, मार्चमधील तापमान नेहमीच्या मर्यादेत असले तरी खूप उष्णता जाणवत आहे. ते म्हणाले, 'गेल्या मार्चच्या तुलनेत शहराच्या तापमानात लक्षणीय बदल झालेला नाही. मात्र, तापमान अधिक आहे. वातारणातील आर्द्रता वाढल्याने  उष्णतेत वाढ झाली आहे. अरबी समुद्रातील ओलाव्यामुळे उष्णता वाढत आहे. 


दरम्यान,  महाराष्ट्रात तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास असून मालेगाव आणि जळगाव येथे 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या मार्च मध्ये कमी दमट वातावरण होते, त्यामुळे यंदाच्या असामान्य उष्णतेच्या लाटेपेक्षा तुलनेने थंड तापमान होते.दरम्यान कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. 


पुढील काही दिवस वातावरण कसं असेल?



26 मार्च : आकाश निरभ्र राहण्याची शक्यता. 


27 मार्च :आकाश निरभ्र राहण्याची शक्यता. 


28 मार्च :आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता. 


29 मार्च :आकाश मुख्यतः निरभ राहून वेळोवेळी दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. 


30 मार्च :आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. 


31 मार्च : आकाश मुख्यतः निरभ राहून वेळोवेळी दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता.


पुण्यात तापमानात वाढ होत असल्याने पुणेकरांनी उन्हापासून बचाव करण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. त्यासोबतच महापालिकेनेदेखील खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. हिट वेव येण्याची शक्यता पाहता पुणे महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. पुणे महानगर पालिकेने उष्माघातापासून वाचण्यासाठी उपाय योजना सुचवल्या आहेत. तसेच बाहेर करतांना काय काळजी घ्यावी याची देखील माहिती दिली आहे. त्यात महत्वाचं म्हणजे उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे ) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे आणि पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत,लस्सी, ताक,नारळ पाणी इत्यादी प्यावे, असा सल्ला दिला आहे. 


राज्यातील विविध शहरात कमाल तापमान किती?


पुणे - 38.9
जळगाव - 39.3
मालेगाव -  40.8 
सातारा -38.4 
सोलापूर -40.6
मुंबई -31.0
परभणी - 40.0
अकोला - 41.0
अमरावती -40.8
वर्धा -40.8 
यवतमाळ -40.2


इतर महत्वाची बातमी-


Shivaji Adhalrao Patil Join NCP :आढळराव पाटील आज हाताला धड्याळ बांधणार;  शिरुरमध्ये घडामोडींना वेग