पुणे : राज्यातील अनेक रुग्णालयात (Pune Crime news)  भोंगळ कारभार आणि हलगर्जीपणा सुरु असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. असाच हलगर्जीपणा औंध जिल्हा रुग्णालयातून (Aundh Hospital Aundha Pune) समोर आला आहे. या हलगर्जीपणामुळे आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी रुग्णालयातील परिचारीकांना चांगलंच खडसावलं आहे. परिचारीकेने रुग्णांना 'ए' ऐवजी 'बी' आणि 'बी' ऐवजी 'ए' रक्त चढवले होते. रक्त गटाची अदलाबदली केली होती. त्यामुळे रुग्णांची प्रकृती खालावली. 


परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. रुग्णांची प्रकृती अधिक खालावली होती. अखेर ही बाब चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेत हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरांना खडसावले आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. परिचारिकेने रुग्णांना 'ए' ऐवजी 'बी' आणि 'बी' ऐवजी 'ए' रक्त चढवण्यात आले होते. रक्त गटाची अदलाबदली केल्याचं समोर आलं होतं. 


दत्तू सोनाजी सोनवणे (वय 58) आणि दगडू सोनवणे (वय 73) यांच्या कुटुंबीयांनी सांगवी पोलिस ठाणे आणि एडीएच प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून चुकीच्या रक्तगटासाठी परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना शनिवारी, 23 मार्च रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. रक्तसंक्रमणानंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती खालावली. दोन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.


सोनवणे यांना 19 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होणे, पोट फुगणे, अंगाला सूज येणे अशी तक्रार त्यांनी केली. रविवारी, 24 मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शनिवारी सोनवणे यांना रक्त ट्रान्सफ्युजन करण्याचा सल्ला दिला. आणखी एक रुग्ण कांबळे याला अशक्तपणा आणि फ्लूमुळे 20 मार्च रोजी एडीएचच्या याच वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना  ट्रान्सफ्युजन करण्यात आले.



ट्रान्सफ्युजन दरम्यान ड्युटीवर असलेल्या नर्सला फोन आला होता आणि तिने चुकीचं रक्त दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांनीही 24 मार्च रोजी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.


इतर महत्वाची बातमी-


Pune Loksabha: काँग्रेसची जुनी खोड रवींद्र धंगेकरांचा घात करणार? डॅमेज कंट्रोलसाठी बाळासाहेब थोरात पुण्यात दाखल