पुणे : मागील काही दिवस पुण्यात चांगला पाऊस पडला आणि पुणेकरांन उन्हापासून दिलासा मिळाला. आता मात्र पुण्यातील तापमानात चांगली वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातदेखील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढील दोन दिवस उन्हापासून काळजी घेण्याला सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, पुण्यातील उष्णतेच्या लाटेची स्थिती हळूहळू पावसात घट होईल. “महाराष्ट्रात आता दोन दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि तो प्रामुख्याने राज्याच्या दक्षिणेपर्यंत मर्यादित राहील. त्यामुळे पुण्यातील तापमानात वाढ आणि उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी पुण्यातील अनेक भागांनी 40 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली, जी गेल्या काही दिवसांपासून शहरात नोंदवण्यात आलेल्या 36-38 अंशांवरून स्थिर वाढ झाली आहे. शिवाजीनगर येथे कमाल तापमान 40.6 अंश तर कोरेगाव पार्क येथे 42.3 अंश नोंदवले गेले. त्याचप्रमाणे राजगुरुनगर येथे 43.9, तळेगाव 43.8, पाषाण येथे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही लक्षणीय वाढ झाली असून, शिवाजीनगर येथे रात्रीचे तापमान तब्बल 27.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा हे तापमान 3 ते 4 अंशांनी जास्त असल्याचे सांगितले जात आहे. कमी पाऊस आणि एल निनो परिस्थिती यामुळे यंदा पुण्यात उन्हाच्या झळा जास्त प्रमाणात अनुभवयाला मिळाल्या. एप्रिलमध्ये कडक उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर मे महिन्याची सुरुवातही काहीशी उष्ण होती. मात्र 10 मे नंतर शहरात सुरू झालेल्या पावसाच्या सत्राने वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाला होता. या काळात पुण्यात दिवसा गरम आणि दुपारी ढगाळ वातावरण आणि पाऊस अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. अशातच आता हवेतील आद्रता वाढल्यामुळे शहरात दिवस आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली. त्यात पुण्यात तोरा वर्षांनी एवढी उष्ण रात्र अनुभवायला मिळाली आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुढील तीन दिवस कसं असेल हवामान, राज्यात पावसाची शक्यता आहे का? नेमकं काय म्हणाले पंजाबराव डख