पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा (Porsche Car Accident Pune) सुरु आहे. या प्रकरणात रोज  नवनव्या गोष्टी समोर येत आहे. त्यात पुण्यातील कोर्टात झालेल्या युक्तीवादाचीदेखील चांगलीच चर्चा सुरु आहे. विशाल अग्रवालने दिलेल्या जबाबात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत आणि अनेक प्रश्नदेखील उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच माझ्या मुलाला गाडी देऊन मी चूक केली?, अशी कबुली विशाल अग्रवाल यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्याला गाडी देणं चुकीचं आहे असं म्हणत विशाल अग्रवालने खंच व्यक्त केली. 

Continues below advertisement


 विशाल अग्रवाने खंत व्यक्त केली आणि कबुली जरी दिली असली तरीही त्यांनी दिलेल्या बाकी जबाबातून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. विशाल अग्रवाल यांची सात दिवसांची कोठडी पुणे पोलिसांनी मागितली होती. मात्र पुणे पोलिसांनी अग्रवालला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दिवसात विशाल अग्रवालयांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली?मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवालहे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? याची चौकशी केली जाणार आहे. 


खोटी माहिती दिली?


हा अपघात झाल्यावर या अपघाताचा सखोल तपास सुरु झाला होता. त्यावेळी पोलिसांनी विशाल अग्रवालला फोन करुन ते कुठे आहेत? याची माहिती विचारली होती. त्यावेळी ते पुण्यात असून त्यांनी शिर्डीला असल्याची माहिती दिली होती, असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं शिवाय अग्रवाल यांनी आपले सगळे मोबाईल लपवून ठेवले आणि ते साधा मोबाईल घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाल्या शक्यता आहे. कारण त्यांची झाडाझडती घेतल्यास पोलिसांना त्यांच्याकडे एक साधा मोबाईल आढळला आहे आणि त्यात नवीन सीमदेखील असल्याचं समोर आलं आहे.  या सगळ्या जबाबानंतर आता अग्रवाल यांच्या चौकशीत काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणाल आहे. 


इतर महत्वाची बातमी-


'मुलाने  कार मागितली तर त्याला चालवायला दे'; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!


Porsche Car Accident Pune : अल्पवयीन मुलामुळे आजोबांचे जुने कारनामे बाहेर, छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर, सुरेंद्र अग्रवालची पुणे क्राईम ब्रँचकडून चौकशी सुरु