पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Weather UPdate) उन्हाचे चटके जाणवत आहे. त्यातच आता शहरात तापमानाने (highest Tempreture In Pune) सर्व विक्रम मोडले आहे. पुण्यातील हडपसर (Hadapsar Tempreture) भागातील कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. त्यासोबतच यंदाच्या उन्हाळी हंगामातील शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक 41 अंश तापमानाची नोंद  झाली. तापमान सरासरीपेक्षा 3.3 अंश सेल्सिअसने जास्त आहे. 


एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुण्यात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. एप्रिलच्या पहिल्या 17 दिवसांचा विचार करता आयएमडीच्या आकडेवारीनुसार यावर्षी पुण्यात 2013 नंतर सर्वात यावर्षी पुण्यात प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत आहे. सरसरी तापमान 39.4 अंशावर आहे. त्यामुळे शहरात मागील 17 ते 18 दिवसांपासून उष्णतेत चांगलीच वाढ झाल्याचं हवामान खात्यांने सांगितलं आहे. 


18 एप्रिलला शिवाजीनगरमध्ये यावेळी पहिल्यांदाच 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने तापमानाने नवा विक्रम रचला गेला आहे. याशिवाय पुण्यातील किमान तापमानात 40 अंशांच्या वर नोंद झाली आहे. जवळपास काही परिसरात 40 अंश सेल्सिअस तर काही भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर कोरेगाव पार्क आणि वडगाव शेरी परिसरातदेखील 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर हडपसरमध्ये सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  लोणावळा येथे सर्वात कमी कमाल तापमान 36.8  अंश सेल्सिअस नोंदले गेले. 


हडपसरमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ


 पुण्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. 18 एप्रिलला हडपसरमध्ये रात्रीची कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील पुण्यातील रात्रीचे हे सर्वाधिक तापमान होते. दरम्यान, शिवाजीनगरमध्येही 24.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते सरासरीपेक्षा 4 अंशांनी अधिक आहे. आयएमडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील दोन दिवस शहरात अस्वस्थ उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. 


कोणत्या परिसरात किती तापमान ?



शिवाजीनगर- 41.0 अंश सेल्सिअस
पाषाण- 41.0 अंश सेल्सिअस        
लोहगाव - 40.6 अंश सेल्सिअस          
चिंचवड 42.0 अंश सेल्सिअस         
लवाळे- 41.8 अंश सेल्सिअस        
मगरपट्टा 42.4 अंश सेल्सिअस
हडपसर 43.5 अंश सेल्सिअस


हेही वाचा :


माजी मुख्यमंत्र्यांचा जावई अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार? ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का!


माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर


दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!