पुणे : पुण्यात तापमाताच चांगलीच वाढ (Pune Weather Update) झाली आहे. पुणे आणि परिसरात पुढील काही (Weather Forecast)दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहणार आहे. पुण्यात सोमवारी 39.8 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाले तर तर 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ढगाळ वातावरण असलं तरीही उष्णता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. उष्णता कायम राहणार असल्याने हवामान खात्यानं खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. त्यात करायचं किंवा काय करु नये, यासंदर्भात माहिती दिली आहे.
उष्माघाताची कारणे
- घराबाहेर जास्त वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे.
-कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे.
-काचेच्या कारखान्यात काम करणे.
-उच्च तापमान खोलीत काम उष्माघात हा थेट उष्णतेच्या सतत संपर्कामुळे किंवा वाढलेल्या तापमानाच्या परिस्थितीमुळे होतो, जसे की घट्ट कपडे घालणे.
उष्माघाताची लक्षणं
थकवा, ताप, कोरडी त्वचा भूक न लागणे, चक्कर येणे, नैराश्य, डोकेदुखी • रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि अस्वस्थता, बेशुद्धी ही लक्षणं जाणवू शकतात.
उष्माघातावर उपचार काय?
रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कुलर खोलीत ठेवावे, वातानुकूलित खोली ठेवावी. • रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घाला रुग्णाच्या कपाळावर थंड पाणी ठेवावे, बर्फाचा पॅक लावावा आवश्यकतेनुसार इंट्राव्हेनस सलाईन द्या.
हे नक्की करा!
पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी / हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करू नका !
शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करु नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिक्स टाळा, खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.
इतर महत्वाची बातमी-