पुणे: पुण्यातली पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केली आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुण्यातली पाणीकपात रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाच्या जोरदार हजेरीमुळं पुण्यातल्या धरणांची पातळी वाढली आहे. तरी देखील पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता.


 

दरम्यान, पाणी कपातीच्या मुद्यावरून पुण्यात चांगलच राजकारण रंगलं होतं. महापौरांनी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयुक्तांनी अंमलबजावणीला विरोध केला.

 

आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपात रद्द करण्यात आल्यामुळं पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.