पुणे : पुण्यातील कोंढवा भागात आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान, सकाळी 7.30 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या दुर्घटनेला बिल्डर आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा दावा केला.

नवलकिशोर राम म्हणाले की, मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांना कंपाऊंडच्या बाजूला राहण्यासाठी निवारा करुण देण्यात आला होता. या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहोत.

पाहा काय म्हणाले जिल्हाधिकारी