पुण्यातील भिंत कोसळून मृत पावलेल्या मजुरांच्या नावांची यादी
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2019 09:43 AM (IST)
पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
पुणे : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. व्हिडीओ पाहा : पुण्यात मृत्यूचं तांडव मृतांची नावे 1.आलोक शर्मा (28) 2. मोहन शर्मा (20) 3. अजय शर्मा (19) 4. अभंग शर्मा (19) 5. रवी शर्मा (19) 6. लक्ष्मीकांत सहानी (33) 7. अवधेत सिंह (32) 8. सुनील सिंह (35) 9. ओवी दास (06) 10. सोनाली दास (02) 11. विमा दास (28) 12. संगीत देवी (26) जखमीचे नाव 1. पुजा देवी (28)