पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
Pune Wall Collapse | पुण्यात मृत्यूचं तांडव, कोंढवा परिसरात भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू | ABP Majha
या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु आहे. त्याला लागूनच बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या होत्या. परंतु रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. आसपासचा परिसरातील जमीन खचली, ज्यामध्ये मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत.
घटनेची काही छायाचित्रे
आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. हे सर्व मजूर बंगाल आणि बिहारमधून आलेले आहेत.