पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात दोन शालेय मुलींचे मृतदेह
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2016 02:23 AM (IST)
पुणे : दोन शालेय मुलींचे मृतदेह मुळा मुठा नदीच्या पात्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी मृत्यूचं गूढ कायम आहे. 16 तारखेला वडगाव परिसरातील चार मुली काही मित्रांसोबत फिरायला गेल्या होत्या. त्यापैकी दोघी मुली घरी परतल्याच नाहीत. त्यांचा मृतदेह नदीत दोरीने हातात हात बांधलेल्या अवस्थेत नदीच्या पात्रात आढळला आहे. स्नेहा मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी या मुलींची नावं आहेत. त्यांचा मृतदेह चंदननगरच्या परिसरात आढळला. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा तपास चंदननगर पोलीस करत आहेत.