Pune Traffic News: पुण्यातील नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद (pune traffic) करण्यात आल्याने मध्यवर्ती भागात मोठी वाहतूककोंडी झाली आहे पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यात दोन्ही बाजूचे रस्तेही बंद असल्याने त्याचा ताण इतर रस्त्यांवर पडून वाहतूककोंडी पहायला मिळत आहे. दुचाकी आणि चारचाकींच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे.


मागील काही दिवस पुण्यात आणि घाटमाथ्यावर प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुठा नदीत विसर्ग केल्यामुळे डेक्कन परिसरालगत असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलं. नदीपात्रातील बाबा भीडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रात पाणी शिरल्यामुळे पात्रालगतचे सगळे रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या डेक्कन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यासोबतच डेक्कन परिसरातून जाणाऱ्या कर्वे रोड, जंगली महाराज रोड, अलका टॉकीज चौकातील रस्त्यावर देखील नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.


दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की नदीपात्रातील रस्ते बंद करण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना दरवर्षी पुणेकरांना करावा लागतो. रस्ता बंद असल्याने पर्यायी रस्ते वापरले जातात. पुण्यात सध्या दुचाकी स्वारांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचं चित्र बघायला मिळतं.


पूरेसा पाऊस झाल्याचा अंदाज
बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला असं समजल्या जातं. काही दिवसांसाठी या पुलावरुन वाहतुक बंद ठेवण्याल आली आहे आणि नदी पात्रातून प्रवास न करण्याचं आवाहन देखील प्रशासनांनी पुणेकरांना केली आहे.