Pune Traffic News : केंद्रीय परिवहन मंत्रालयाने (Union Ministry of Transport) महाराष्ट्रातील अनेक महामार्गांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम सुरु केलं आहे. मुंबई-गोवा महामार्गानंतर आता पुणे (Pune) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 117 (तळेगाव धामढेरे ते जेजुरी) चे काम हाती घेण्यात आलं आहे. शिंदवणे घाटमाथा येथे रस्ता दुरुस्तीचे आणि पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळं आजपासून (24 मार्च) पुणे जिल्हा प्रशासनाने वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील (Waghapur to Shindwane route) सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाहतूक आजपासून म्हणजे 24 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. 


आजपासून वाहतूक बंद 


राज्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. पुणे जिल्ह्यातही रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने वाघापूर-शिंदवणे मार्गावरील सर्व वाहतूक आजपासून  बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर खड्ड्यांमुळं अपघात होत होते. त्यानंतर अनेकांनी या रस्त्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळं केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीनं रस्ता दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ वाघापूर-शिंदवणे मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


खड्डेमय रस्त्यांमुळं वाहन चालकांना मोठा त्रास


पुणे जिल्ह्यातील वाघापूर ते शिंदवणे रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून खड्डेमय रस्त्यांमुळं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर आता पुणे जिल्हा प्रशासनानं महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतलं आहे. याशिवाय शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे कामही सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळं वाघापूर ते शिंदवणे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाघापूर ते शिंदवणे रस्त्यावर 24 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 


वाहतुकीचे पर्यायी मार्ग कोणते?


वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सासवड-पिसर्व-टेकवडी-बोरियंडी मार्गावरुन वळवण्यात आली आहे. याशिवाय सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गाचाही वाहनचालक वापर करु शकतात. संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


2024 च्या अखेरीस आम्ही अमेरिकेप्रमाणे रस्ते अन् उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करु: नितीन गडकरी