Pune TET Scam : टीईटी परीक्षेत (TET Exam) उत्तीर्ण असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याचं तपासात उघड झालंय. गुणवत्तेच्या जोरावर उत्तीर्ण होऊनही आत्मविश्वास नसल्यानं पात्रतेसाठी पैसे दिल्याचं समोर आले आहे. उमेदवारांच्या ओएमआर शीटची तपासणी करत असताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणी 7 हजार 800 शिक्षकांची यादी पुणे सायबर पोलिसांकडे तयार असल्याची माहिती समोर येतेय


पात्रतेसाठी 21 शिक्षकांनी दिले पैसे
 पुणे टीईटी घोटाळा प्रकरणी  शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणी सध्या सेवारत अपात्र शिक्षकांची यादी पुणे पोलिसांच्या हाती लागलीय. परीक्षा पात्रता गैरव्यवहारप्रकरणी 7800 तब्बल शिक्षकांची यादी सायबर पोलिसांनी तयार केली आहे. परीक्षा पात्रता चांगल्या गुणांनी पास असूनही 21 शिक्षकांनी पैसे दिल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालंय. ओ एम आर शीटची तपासणी करत असताना त्यात 21 शिक्षक हे त्यांच्या गुणवत्तेवर पास झाल्याचं आढळून आलं आहे. आत्मविश्‍वास नसल्याने त्यांनी पात्र होण्यासाठी पैसे दिले, पात्र परीक्षार्थींच्या यादीतून या शिक्षकांची नावे काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता हे शिक्षक कोण आहेत? आता पोलीस काय कारवाई करणार? हे पाहव लागणार आहे.


आता पोलीस काय कारवाई करणार?


मागील काही काळात राज्यभरात आरोग्य भरती, पोलीस भरती  (Police recruitment) आणि त्यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरण (TET Scam) चांगलंच गाजलंय. पुण्यातील सायबर पोलिसांनी (Pune cyber police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना, टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. टीईटी घोटाळ्यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांकडून ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं ही तपासणी केली जात आहे. ओएमआर शीट तपासणीमधून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने येत्या काळात या प्रकरणी अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


TET Exam Scam : TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन; दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक


टीईटी घोटाळ्यात नवा ट्वीस्ट, सुपेनंतर आणखी एका आरोपीकडून 24 किलो चांदी दोन किलो सोनं, काही हिरे जप्त


Tukaram Supe : सुपेंचे किती छुपे धंदे? आणखी 10 लाखांची रक्कम सापडली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha