पुणे : पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील चाळे प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गौरव आहुजाला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला अटक केल्यानंतर न्यायालयानं एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे शहरातील शास्त्री चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध BMW कार उभी करून गौरव आहुजाने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनीआहुजासह ओसवालला ताब्यात घेतलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर चौकात भररस्त्यावर महागडी कार थांबवत, एक तरुण रस्त्याच्या मधोमध लघुशंका करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी त्याचा ञ मित्र कारमध्ये मद्याची बाटली घेऊन बसल्याचे दिसते. पोर्शे कार प्रकारानंतर उजेडात आलेल्या या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशा माजोरड्या कृतींना वेळीच पायबंद घाला, अशी मागणी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका; मी आठ तासांत सरेंडर होईना काल माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य झाले, ते चुकीचे होते. मी जनता, पोलिस विभाग आणि शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो. मला एक संधी द्या. मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिस स्टेशनला हजर होणार आहे. प्लीज माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती करीत गौरव अहुजा याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
कस्टडीमध्ये असलेल्या मित्रासाठी पाठवलं जेवण
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये बसलेल्या आणि हातात दारूची बाटली असलेल्या भाग्येश अग्रवाल याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्स मध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन आले होते. मात्र, त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्यांना हाकलावून लावलं. तो पार्सल घेऊन आलेला तरूण पुन्हा पोलीसांनी हाकलावून लावल्यानंतर ते पार्सल घेऊन परत जाताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यात गौरव याला अटक केली होती. या हायप्रोफाइल रकेटमध्ये गैंगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी केले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यात गौरव आहुजा, सुनील मखिजा तसेच अजय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या: