Raj Thackeray: देशात राजीव गांधी असल्यापासून मी ऐकतोय की गंगा स्वच्छ होणार. त्यानंतर राजीव कपूर यांनी चित्रपटाही काढला. लोकांना वाटलं गंगा झाली साफ. मात्र त्यात वेगळीच गंगा. किंबहुना अद्याप गंगा साफ झालेली नाही. देशातली एकही नदी स्वच्छ नाही. कोरोना आजारातून देश नुकताच बाहेर निघाला आहे. मात्र कुणालाही त्याचं देणंघेणं नाही आणि लोक कुंभमेळ्यात गर्दी करत अंघोळी करत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा. अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा. असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळ्यातील (Mahakumbhmela 2025)  पवित्र स्नानावर भाष्य करत खिल्ली उडवलीय. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ते पिंपरी चिंचवड मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा- राज ठाकरे

मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारलं असता त्यातला अनेकांनी आपली आपली करणं दिली. त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. शिवाय परत आल्यावर अंघोळ केली का असं ही विचारलं. बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी नाही पिणार पाणी वैगरे, असं मी त्यांना म्हणालो. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करताय आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असं म्हणत  राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली आहे.

आपण नद्यांना माता म्हणतो तरीही नद्या अस्वच्छ- राज ठाकरे

नुकताच करोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला  कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. कुणालाही कुणाचं देणंघेणं नाही. आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडलं जातं. नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा. असेही राज ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा