पुणे: पुणे शहरातील शास्त्री चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध BMW कार उभी करून लघुशंका करून त्याने जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भर रस्त्यावर कार उभी करून लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार घडला, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांसह नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अखेरीस या तरूणांवर गुन्हा दाखव करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याआधी काल गौरव आहुजाने गायब झाल्यानंतर माफी मागतानाचा व्हिडिओ शेअर केला. पण तो पोलीस स्टेशनला हजर झाला नाही. त्याने 8 तासांचा वेळ मागितला. मात्र, पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघांचीही वैद्यकीय चाचणी पुर्ण झाली आहे. याबाबत पुण्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.


एबीपी माझाशी या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव  म्हणाले, काल (शनिवारी) सकाळी 7.30 वाजता शास्त्रीनगर भागात तरुणाकडून अश्लील वर्तन केले गेले. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, काल भाग्येश ओसवाल याला अटक केली होती. मुख्य आरोपी गौरव अहुजा याला सातारा येथून ताब्यात घेतलं आहे.
या पुण्यातल्या दोन्ही आरोपींना आता आम्ही अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय प्राथमिक अहवाल आमच्याकडे आला आहे, पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.


त्याचबरोबर पोलिस कोठडीत असलेल्या भाग्येश ओसवाल याला त्याच्या मित्रांनी बाहेरून खाण्यासाठी बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स पाटवले होते, त्यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना हिंमत जाधव म्हणाले, आरोपी कस्टडीत असेपर्यंत नियमाने ज्या गोष्टी आहेत, जो भत्ता कायद्याप्रमाणे दिला जातो, तोच भत्ता त्यांना देण्यात येईल. बाहेरची कुठलीही गोष्ट त्यांना खायला देण्यात येणार नाही. काही वेळात आरोपींना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे. येरवडा पोलीस स्टेशन मधून या आरोपींना कोर्टाकडे नेण्यात आलं आहे.


कस्टडीमध्ये असलेल्या मित्रासाठी पाठवलं जेवण


मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये बसलेल्या आणि हातात दारूची बाटली असलेल्या भाग्येश अग्रवाल याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्स मध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन आले होते. मात्र, त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्यांना हाकलावून लावलं. तो पार्सल घेऊन आलेला तरूण पुन्हा पोलीसांनी हाकलावून लावल्यानंतर ते पार्सल घेऊन परत जाताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे. 


नेमकं प्रकरण काय?


येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर चौकात भररस्त्यावर महागडी कार थांबवत, एक तरुण रस्त्याच्या मधोमध लघुशंका करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावेळी त्याचा ञ मित्र कारमध्ये मद्याची बाटली घेऊन बसल्याचे दिसते. पोर्शे कार प्रकारानंतर उजेडात आलेल्या या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशा माजोरड्या कृतींना वेळीच पायबंद घाला, अशी मागणी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका; मी आठ तासांत सरेंडर होईना काल माझ्याकडून सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य झाले, ते चुकीचे होते. मी जनता, पोलिस विभाग आणि शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो. मला एक संधी द्या. मी पुढच्या आठ तासांत येरवडा पोलिस स्टेशनला हजर होणार आहे. प्लीज माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्रास देऊ नका, अशी हात जोडून विनंती करीत गौरव अहुजा याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.