Pune Child Sexual Abuse Case: 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि इतर तीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आज वरिष्ठ IAS अधिकारी मारुती सावंत यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मार्च महिन्यात हा प्रकार उघकीस आला होता. या प्रकाराबाबत मुख्यध्यापिकेने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही घटना उघडकीस आल्यावर 1998 च्या बॅचच्या पदोन्नती झालेल्या IAS अधिकाऱ्याची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद (MCAER), पुणे येथे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्च 2015 मध्ये सिंहगड पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. नंतर त्याला महाराष्ट्र राज्य सरकारने निलंबित केले होते. त्यानंतर पोलिसांनी या तपासावर देखरेख ठेवली होती.


मुख्याध्यापिकेने दिली तक्रार
मुलीवर अत्याचार झाल्याचं समज्यावर त्या शाळेतील मुख्यध्यापिकेने तक्रार दाखल केली होती. सिंहगडराेड पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार केली होती. या शाळेत मुलींच्या मानसिक आरोग्यासाठी आणि मुलींना माहिती देण्यासाठी समुपदेशनाचा तास होता. त्यासाठी महिला समुपदेशक नेमल्या होत्या. त्यावेळी हे सगळं प्रकरण समोर  आलं होतं.


चाॅकलेटचं आमिष दाखवत असत
समुपदेशनाच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चाॅकलेटचं आमिष दाखवत असत असं कळलं. आराेपी मारुती सावंत हा मुलींना त्याच्या फ्लॅटवर बाेलवून चाॅकलेट खाण्यास देण्याच्या अमिषाने त्यांच्याशी अश्लील चाळे करत हाेता. मुलीला कम्प्यूटरवर पॉर्न फिल्म दाखवत असत. फोटोही दाखवत असत. हा प्रकार तीन वर्ष सुरु होता. तीन वर्ष शारीरिक संबंध असलेल्याचं उघड झाल्यानंतर संतापाचं वातारण निर्माण झालं होतं.


नेमका विश्वास कोणावर ठेवावा?
जनतेच्या अधिकाऱ्यांकडून अनेक अपेक्षा असतात. सुरक्षेच्या अपेक्षा असतात. मात्र अनेक वेळा वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी अशा प्रकारचे चाळे करताना आढळून येतात. मात्र असे प्रकरणं समोर आल्यावर आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेचा पालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण होते. त्यामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवावा, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.