पुण्यात स्कूल बसच्या धडकेत सव्वा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2018 04:41 PM (IST)
15 महिन्यांच्या श्रध्दा एकनाथ दिरघट्टी या चिमुकलीचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला.
प्रातिनिधीक फोटो
पुणे : स्कूल बसच्या धडकेत सव्वा वर्षांच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले. पुण्यातील शिक्रापूर भागात ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. 15 महिन्यांच्या श्रध्दा एकनाथ दिरघट्टी या चिमुकलीचा स्कूल बसच्या धडकेत मृत्यू झाला. श्रद्धा सकाळी आठ वाजता तिच्या आईसोबत मोठ्या बहिणीला स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी आली होती. सोसायटीच्या खाली श्रद्धाच्या आईने मोठ्या मुलीला स्कूल बसमध्ये सोडलं, मात्र नजरचुकीने श्रद्धा बसच्या समोर गेली. चालत्या बसचा धक्का लागल्यामुळे श्रद्धा खाली कोसळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.