Pune School Update : पुढील सात दिवसांमध्ये पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचाआढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगतलं आहे. राज्य सरकारने राज्यभरातील 23 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे सोपवला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून शाळा सुरुही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. पुण्यातील शाळांबाबत येत्या सात दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस मुख्यालयात ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.


यावेळी अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका व्हाव्यात अशी भूमिका असल्याचं म्हटलं आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे गेल्यातर आभाळ कोसळत नाही. कारण पाच वर्ष हा मोठा कालावधी आहे. या कालावधीत ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


राज्य मागासवर्गीय आयोग ओबीसी आरक्षणावर निर्णय घेणार आहे. राज्य सरकार फक्त आयोगाला माहिती उपलब्ध करून देणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच, उद्या राष्ट्रवादीत काहीजण प्रवेश करणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला कोणतीही अडचण न येता पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha