Pune School पुणे: पुण्यात (Pune) एकूण 49 शाळा अनधिकृत (Unauthorized School) असल्याचे निदर्शनास आले होते. शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातील दहा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अन्य 10 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.


पुणे जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये 49 शाळांचा समावेश होता. त्यातील काही शाळा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, तर काही शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि काही शाळा पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत. पुणे जिल्हा परिषदेने अनधिकृत शाळांवर बडगा उगारल्याने शिक्षण क्षेत्रातून मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी केवळ अनधिकृत शाळांची नावं जाहीर केली जात होती. यावेळी प्रत्यक्षात अनधिकृत शाळेवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.


बंद केलेल्या शाळांची नावे खालील प्रमाणे आहेत-


1. किड्जर्जी स्कुल, शालीमार चौक दौंड


2. जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी, दौंड


3. यशश्री इंग्लिश मिडीयम स्कुल सोनवडी, दौंड


4. भैरवनाथ इंग्लिश मिडियम स्कुल मोई, खेड


5. संस्कृती इंटरनॅशनल स्कुल, आंबेगांव खुर्द, हवेली


6. श्रीमती सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी


7. रिव्हस्टोन इंग्लिश मिडीयम स्कुल, पेरणे फाटा


8. सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल, फुरसुंगी


9. श्रेयान इंटरनॅशनल स्कुल साईनगर गहुंजे, ता. मावळ


10. व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल, नायगांव, ता. मावळ


11. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कुल, कासारवाडी


12. श्री. चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कुल विशालनगर, पिंपळे निलख 


13. केअर फौंडेशन पुणे संचलित इमॅन्युअल पब्लिक स्कुल, महंमदवाडी रोड, हडपसर


पुणे मुंबईपासून येणार हाकेच्या अंतरावर


160 वर्षांनंतर पहिल्यांच मोठे घाट आणि 28 बोगद्यांना बायपास करण्यासाठी मुंबई आणि पुणे (Pune Railway) दरम्यान नवीन रेल्वे योजना गेल्या आठवड्याच्या शेवटी मंजूर झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी मध्य रेल्वे विभागाला त्यावर जलदगतीने काम करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोणावळा येथे थांबलेल्या तीन डब्यांच्या विशेष ट्रेनमध्ये त्यांनी प्रवास केला आणि घाटांवर नेव्हिगेट करण्याच्या प्रक्रियेची आणि बँकर लोकोमोटिव्हच्या ऑपरेशनची तपासणी देखील केली. पुणे-मुंबई दरम्यान घाट मार्गावरील तीव्र चढण कमी करण्यात येईल. त्यामुळे बँकर जोडण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.



संबंधित बातमी:


गुडन्यूज! सोने 2 तासांत 3 हजारांनी स्वस्त; पुण्यात ग्राहकांना लॉटरी, बजेटनंतर आनंदी-आनंद