पुणे : आतापर्यंत सर्वसामान्यांना त्रास देणारा बिबट्या (Leopard) आता नेत्यांच्या घरापर्यंतही जाऊन पोहोचला असल्याचं दिसतंय. जुन्नरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांच्या निवासस्थानी अचानक बिबट्या आला. तरस मागे लागल्याने या बिबट्याने इलेक्ट्रिक फेन्सिंगच्या भिंतीवरून (Electric Fencing Wall) उडी मारून आत प्रवेश केला. काही वेळाने हा बिबट्या बाहेरही गेला. या सगळ्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
जुन्नर विधानसभेची निवडणूक लढलेले शरद पवारांच्या गटाचे नेते सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी बिबट्याने कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून आत प्रवेश केला. या प्रसंगी बिबट्याच्या मागावर एक तरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Electric Fencing System : इलेक्ट्रिक फेन्सिंग यंत्रणा कुचकामी
सत्यशील शेरकर या कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसविण्यात आले असून त्यातील विद्युतप्रवाहाची तीव्रता सुमारे 9 हजार डीसी व्होल्ट इतकी आहे. इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असतानाही बिबट्याला धक्का बसला नसल्याचे आढळून आले. फेन्सिंगशी संलग्न सुरक्षा यंत्रणेतील सायरनही वाजला, मात्र बिबट्याने काही वेळ बंगल्याच्या आतील परिसरातही हालचाल केल्यानंतरच येथील परिसर सोडला.
Pune Leopard Attack News : ठाम उपाययोजनेची मागणी
सध्या बिबट प्रवण क्षेत्रात राज्य शासनाच्या वतीने झटका देणारी ‘शॉक मशीन’ बसविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळात दिसून येईलच. मात्र सत्यशिल शेरकरांच्या निवासस्थानच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे या यंत्रावर शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे यावर शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी आता होत आहे.
Pune Leopard News : बिबट्यापासून रक्षणासाठी गळ्यात लोखंडी पट्टे
उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे. बिबट्याच्या दाहशतीन ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. या बिबट्यापासून स्वतःच रक्षण करण्यासाठी ग्रामस्थ विविध उपाययोजना करताना दिसतात.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टाचं घातला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो, अशा वेळी शेतात राबताना हा बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा थेट गळ्यात घातला आहे. बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांना अशाप्रकारे उपाययोजना करायला लागणं ही लाजीरवाणी बाब असून वनविभाग काय करतयं अशा सवाल उपस्थित होत आहे.
ही बातमी वाचा: