Continues below advertisement

पुणे : उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून त्याच्या दहशतीन ग्रामस्थ भयभीत झाल्याचं चित्र आहे. आता या बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ वाटेल त्या उपाययोजना करत आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टाच घातलाय. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो. अशा प्रसंगी शेतात राबताना बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातल्याचं चित्र आहे.

शेती हेचं उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. त्यावर पर्याय म्हणून जसं कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, तसे पट्टे घालण्याचा निर्णय या बळीराजाने घेतला आहे.

Continues below advertisement

Leopard Attack Pune : प्रशासनाचं सपशेल अपयश

राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं बळीराजावर टोकदार खिळ्यांचे पट्टे परिधान करण्याची वेळ आली आहे आणि हे खरंच लाजिरवाणे आहे.

याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "कबूतरांच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेतली होती. पण इकडे बिबट्याने 57 बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली. आम्हाला त्यासाठी रास्तारोको कराव लागलं. आमची मागणी आहे की बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा. तसे जर केरळ सरकार घोषित करत असेल मग आपल्या मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे?"

Man Eating Leopard Killed : तिघांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्या ठार

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे. रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. नंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला गेला, डार्ट मिस झाला.

यामुळं सावध झालेल्या बिबट्याने थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावरती तीन राऊंड फायर केले, यात बिबट्या ठार झाला. 6 वर्षे वयाचा नर जातीचा हा नरभक्षक बिबट्या आहे. 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आलं. हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि ठस्यांवरून स्पष्ट झालं आहे.

ही बातमी वाचा: