पुणे : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेले पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला. शिरसाट यांचा खून झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


विनायक शिरसाट 5 फेब्रुवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्यांचं अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासही सुरु केला होता.

VIDEO | ताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह | पुणे | एबीपी माझा



शिरसाट यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन ताम्हिणी घाटात दाखवत होतं. त्यानुसार शोध घेत असताना पोलिस ताम्हिणी घाटात पोहोचले. तिथे सोमवारी (11 फेब्रुवारी) दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. पोलिस अधिक तपास करत आहेत.