Pune Rickshaw Strike: पुण्यात (Pune) रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात आज अनोखं आंदोलन केलं आहे. संगम ब्रिज येथील आरटीओ (RTO) कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली आहे. शकडोच्या संख्येने रिक्षा रस्त्यावर उभ्या आहेत आणि त्यांचे चालक हे घरी निघून गेले आहेत. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रिक्षा चालक आक्रमक (Rickshaw Strike) झाल्यानंतर आता पोलीस ही अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पोलीस आता स्वतः रस्त्यावर उतरेल आहेत. पोलीस हे स्वतः रिक्षा रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर जवळपास दुपारी 3 वाजता पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रिक्षा चालकांची बैठक फिस्कटली. त्यानंतर आज सायंकाळी मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा या रस्त्यावर सोडल्या आणि ते घरी निघून गेले. यानंतर पोलीस आता अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. संगम ब्रिज येथील हा रस्ता पुण्यातील अत्यंत महत्वाचा रस्ता आहे, जो सकाळी 11 पासून बंद आहे. 10 ते 11 तास हा रास्ता बंद असल्याने आता पोलिसांनी आंदोलक रिक्षा चालकांना रस्त्यावरून रिक्षा हटवण्याची विनंती केली आहे. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक देखील दाखल झालं आहे.
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत एबीपी माझाशी बोलताना संदीप कर्णिक म्हणाले आहेत की, पूर्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यांनी (रिक्षा चालकांनी) त्यांचं आंदोलन केलं आहे. मात्र आमची त्यांना विनंती होती की, जनतेला वेठीस धरू नका. आम्ही त्यांना विनंती केली आणि थोडं माग केलं. सध्या तरी ते सहकार्य करत आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, थोड्याच वेळात रस्त्यावरून रिक्षा हटवण्यात येतील. तसेच जे रिक्षा चालक सहकार्य करत नाही आहे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या: