Pune Rickshaw Bandh Protest: पुण्यातील (Pune News) बघतोय रिक्षावाला संघटनेचे (Baghtoy Rikshawala Association) अध्यक्ष केशव क्षीरसागर (Keshav Nana Kshirsagar) यांना अटक करण्यात आली आहे. रिक्षा आंदोलनावेळी (Pune Rickshaw Protest) चक्काजाम केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, काल पुण्यात रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात आंदोलन केलं होतं. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं.


काल झालेल्या रिक्षा आंदोलना वेळी चक्काजाम केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  काल संध्याकाळी रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या. यावेळी 30-40 रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर याप्रकरणी कारवाई करत बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 


पुण्यात रिक्षा चालकांच्या आंदोलनावेळी नेमकं घडलं काय? 


पुण्यात (Pune News Latest Updates) रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात काल अनोखं आंदोलन केलं. संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे 16 रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रस्त्यात रिक्षा सोडल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. रात्री आठ वाजल्यानंतर दंगल नियंत्रण पथक रस्त्यावर उतरलं. हजार एक पोलीस रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी रिक्षाचालकांना रिक्षा हटवण्याचं आवाहन केलं. मात्र रिक्षाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. 


पुण्यातल्या बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सी वाहतुकीविरोधात रिक्षाचालकांनी सोमवारी पुन्हा संप करून, राज्य सरकारविरोधात निषेध नोंदवला. त्यामुळं पुण्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पुण्यातल्या रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून, आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात 10 संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळं आरटीओ चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. याआधी पुण्यातल्या रिक्षाचालकांनी 28 नोव्हेंबरला संप केला होता. रॅपिडो कंपनी पुण्यात बाईक टॅक्सी बंद करत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचाही इशारा