पुणे :  मराठा आंदोलनाची धग (Maratha Reservation Protest) आता पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आदोलकांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे.  मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. त्यामुळे नवे पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मराठा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे.  मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक आडवली आहे. 


पोलीस काय म्हणाले?


पुणे-बंगळूरु मार्ग हा पुण्यातील महत्वाचा मार्ग आहे. रोज लाखो लोक या मार्गावरुन प्रवास करत असतात. मात्र याच मार्गावर मराठ्यांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आणि त्यात रुग्णवाहिका आणि स्कूलबसचादेखील समावेश आहे. महिला आणि विद्यार्थी अडकले आहेत. सोलापूरकडे जाणारा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे शिवाय सर्व्हिस लेनदेखील सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय अनेक पोलीस अधिकारीदेखील रस्त्यावर दिसत आहे. मराठ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मराठे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलीसांना न जुमानता थेट टायर पेटवायाला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी विस्कळीत झाली आहे. मराठा कार्यकर्त्यांची संख्यादेखील वाढत आहे. 


 मराठा आरक्षण द्या... नाहीतर...


सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. त्यांनी आरक्षण द्यावं आणि राज्यातील मराठ्यांचा प्रश्न सोडवावा,. अनेक लोक आत्महत्या करत आहेत. अनेक ठिकाणी कायदा आणि व्यवस्थेचा मुद्दा निर्माण झाला आहे. राज्यातली ही परिस्थिती नियंत्रणाल आणायाची असेल आणि सगळं सुरळीत करायचं असेल तर त्यांनी थेट आरक्षण जाहीर करावं. नाही तर महाराष्ट्र असाच पेटत राहिल, असं मराठा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


ST Bus: 80 पेक्षा जास्त एसटी फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद, एक कोटीचे नुकसान; मराठा आंदोलनाचा भडका!