पुणे: शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी (Pune Covid Center Scam) एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजीव साळुंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहे. भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विटर वरुन दिली माहिती दिली आहे.
संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांना अटक करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. डॉ हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजित पाटकर हे अद्याप फरार असून त्यांना अटक करा अशी सोमय्या यांनी मागणी केली आहे. राजीव साळुंखे हे सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस चे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना काळात मोठा घोटाळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याचदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं ते म्हणाले.
ब्लॉक लिस्ट झालेल्या कंपनीला पुन्हा काम कसं दिलं?
ही सगळी बाब समोर आल्यावर आणि कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये केल्यानंतरही संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकराचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले. ब्लॉक लिस्ट झालेल्या कंपनीला पून्हा काम कसं दिलं जातं, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.