Pune Rain Update: पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर (Pune Rain Update) काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र शहर परिसरातील धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्राच्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड, पुण्यातील एकता नगर परिसर गेल्या वेळी पाणी शिरलेल्या सोसायट्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांचं सुरक्षित स्थळी स्थलातंर करण्यात आलेलं आहे. धरण क्षेत्रात (Dam water) चांगलाच पाऊस झाल्याने (Pune Rain Update) धरणे 90 टक्क्यांच्या वरती गेल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येत आहे. 


आज संध्याकाळी 5 वाजता खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) 45 हजार पाण्याचा विसर्ग होणार आहे. बोटीतून सोसायट्यांमध्ये जाऊन सतर्कतेच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. काही सोसायट्यामधील नागरिक त्याच्या घरात आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील धरण साखळीत पावसाचा जोर कायम (Pune Rain Update) आहे. त्यामुळंच खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) सायंकाळी पाच वाजता विसर्ग वाढवला जाणार आहे. 35 हजारांवरून हा विसर्ग 45 हजार इतका विसर्गाचा वेग वाढवला जाणार आहे. त्यामुळं थेट बोटीतून सोसायट्यांमध्ये जाऊन सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. 


राजगुरुनगर जवळील खरपुडी येथे भिमा नदीवर नागरिकांचा जीवघेणा प्रवास


उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात मुसळधार पाऊस (Pune Rain Update) सुरु आहे. ओढे नाले नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील रस्ते बंद झाल्याने गावांचा संपर्क तुटला. मात्र, नागरिकांकडून खोलवर पाण्यातून धोकादायक प्रवास केला जात आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडण्याची भिती व्यक्त केली जाते. नागरिकांनी खोलवर पाण्यातून प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असले तरी नागरिक मात्र धोकादायक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.


ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता


पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम (Pune Rain Update) आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर (Pune Rain Update) आले आहे. अशातच मावळ तालुक्यातील तिकोणा (वितंगगड) किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


खडकवासला धरणातून खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35002 क्युसेक्स विसर्ग वाढवून तो सायंकाळी 05:00 वा. 45705 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.