Pune Rain Update: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain Update) पुन्हा एकदा हजेरी लावली. मागील आठवडाभरापासून उकाडा सहन करणाऱ्या पुणेकरांची काल काहीसा दिलासा मिळाला. काल(शनिवारी) पुणे शहर परिसरात वादळी वाऱ्यासह गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. शहर आणि उपनगरांसह ग्रामीण भागामध्येही पावसाने हजेरी लावली. तर पुढील आठवडाभर म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत (२३ ऑगस्ट) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात कडक उन्हाच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे ऐन ऑगस्ट महिन्यात ‘ऑक्टोबर हिट’जाणवू लागली होती. अशातच काल (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह शहर आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) पुणेकरांची पळापळ झाली.
पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पुणे शहरातील हडपसर, पेठा परिसर, मुंढवा, केशनवगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, येरवडा, कात्रज, कोंढवा, कोथरूड, वारजे माळवाडी, औंध, पाषाण, बावधन, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक परिसर, एरंडवणे यासह जिल्ह्यातील लोणावळा, वडगाव मावळ या ठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली.
राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात
राज्यात पुन्हा पाऊस पडण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. अनेक भागात पुरस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र, काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे (Heavy Rain) पुनरागमन होणार आहे.
पुढील 36-48 तासांत पावसाचे पुनरागमन
राज्यात आज आणि उद्या मध्यम पावसाची अपेक्षा आहे. सोमवार-मंगळवारपासून मुसळधार पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यातही तापमानात घट होईल आणि पुढील 36-48 तासांत पावसाचे (Heavy Rain) पुनरागमन होईल अशी माहिती हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain) हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही भागात वगळता उर्वरित ठिकाणी भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. मुंबईत ठाणे देखील पुढील आठवड्यात हलक्या पावसाला (Heavy Rain) सुरवात होणार आहे.