Pune : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी  प्रवाशी बसला अपघात झाला. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला आहे.


जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळलीय


टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली. ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळलीय. या बसमध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार कमी दाखल केलंय. 


खासगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती


या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस आणि एनएचएआय चे पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. खासगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र बसचा आणि या खाजगी मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे मोठे नुकसान झालय. तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस महामार्गावर अपघात ग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचे काम करत असून पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Sambhajiraje Chhatrapati : मनोज जरागेंना तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु, त्यासाठीच भेटलो होतो : संभाजीराजे छत्रपती