पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पोर्शे कारचालक (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. शिवानीनेच ससून रक्ताचे सॅम्पल दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई झाली होती. शनिवारी वडगाव शेरीमधील राहत्या घरातून शिवानीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर तिला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. अल्वपयीन पोराचे सॅम्पल बदलून कचऱ्यात फेकण्यात आले होते. त्यामुळे बदलण्यात आलेलं स्मॅपल कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते अल्पवयीन पोराच्या आईचे असल्याचे स्पष्ट झालं आहे. 


डीएनए चाचणी केली जाणार


शिवानीने केलेल्या चौकशीत रक्त दिल्याचे कबूल करतानाच मुलगाच गाडी चालवत होता, अशी माहिती दिली आहे. रक्त नमुने बदलल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांना ते रक्त कोणाचे हे शोधायचे होते. मात्र शिवानीने ते रक्त आपले असल्याची कबुली दिली. मात्र, त्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलिसांनी ससूनमधील सीसीटीव्ही पाहिल्यानंतर अल्पवयीन मुलासह चौघेजण उपस्थित असल्याचे समोर आलं आहे.याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच निलंबनाची सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत पुराव्यांशी छेडछाड, ड्रायव्हरला धमकावणे तसेच रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकून देण्याच्या आरोपाखाली दहा जणांना अटक करण्यात आली आहे. अग्रवालच्या घरातील तीन अटकेत असून अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात आहे. 


आई मुलाकडून उडवाउडवीची उत्तरे 


दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी येरवडामधील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात दोन तास शिवानी अग्रवालसह तिच्या अल्पवयीन मुलाची चौकशी केली होती. मात्र, दोघांनी सुद्धा त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अल्पवयीन पोराची पालकांसमोर चौकशी करण्यास बाल न्याय मंडळाने पोलिसांना परवानगी दिल्यानंतर ही चौकशी करण्यात आली. अपघात झाला तेव्हा कार कोण चालव होते, ब्लॅक आणि कोझी पबमध्ये कोण सोबत होते, ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले तेव्हा कोण उपस्थित होते, याबाबतची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी मुलाने पोलिसांना तपासात फारशी माहिती दिली नाही. तसेच, मुलाची आईदेखील नीट उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या