पुणे : पुणे पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Accident) पुण्यातील बार आणि रुफ टॉप हॉटेलवर (Pune Pub and Bar) कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता पिंपरी-चिंडवड महापालिकादेखील खडबडून जागी झाली झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आता पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड भागात रूफ टॉप हॉटेलवर हातोडा चालवला आहे. तसेच बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे. 9000 चौ फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत रूप टॉप हॉटेल्स पाडण्यात आले. 


पिंपरी-चिंचवडमधील बाणेर, बालेवाडी आणि वाकड परिसरात अनेक पब आणि रुफ टॉप हॉटेल्स आहे. या परिसरात यामुळे अनेक नागरिकांना त्रास होतो. अनेकदा नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र कारवाई करण्यात आली नाही. त्यासोबतच रात्री दीडनंतरदेखील या परिसरातील अनेक पब आणि हॉटेल्स सुरु असतात. तरुणांचा रात्रीचा धिंगणा सुरुच असतो.  कोरेगाव परिसरातील याच रात्रीच्या धिंगाण्यामुळे दोघांचा जीव गेला. पोर्शेगाडीने धडक दिल्यानं दोघं जीवाला मुकले. अशीच घटना पुन्हा होऊ नये म्हणून अनेक परिसरातील पब आणि रुफ टॉप हॉटेलवर करावाई करण्यात येत आहे. 


बॉलर, डिमोरा, टू बीएचके बंद


पुण्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या पब वर राज्य उत्पादन शुल्काची राज्य मोठी कारवाई केली आहे.बॉलर, डिमोरा, टू बीएचके, यासह अनेक पब आणि बार यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग राजपूत यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. पुढील आदेश येईपर्यंत जवळपास 49 पब बंद राहणार आहेत. रजिस्टर मेंटेन न करणे, प्रिमायसेसच्या बाहेर दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणे, अशी अनेक कारण दाखवत या पब वर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग व त्यांच्या टीमचे तीन दिवसात हॉटेल्स पब वर मोठ्या कारवाया केल्या आहेत.


बॉम्बे प्रोहिबिशन कायदा 1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम 1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Accident : बापानंतर आता आजोबाचा नंबर; ड्रायव्हरला डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी