Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारने चिरडून ठार केलेल्या (Pune Porsche Car Accident) दोन आयटी इंजिनिअर्सना न्याय मिळवून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. धंगेकर यांनी पुणे पोलिस आयुक्त कोणीही दोषी आहे असे मानत नाहीत कारण बिल्डर्सच्या पैशावर काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  


अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही


धंगेकर यांनी ट्विट करत मुंढवा पोलिस स्टेशनच्या कारभाराचे वाभाडे काढतानाच थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...? 






असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे. दिवस 1 ला - मुंढवा पोलीस स्टेशन - हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.


आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर..!


पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोल


धंगेकर यांनी येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर सुद्धा ठिय्या आंदोलन केले होते. ते म्हणाले होते की, "या प्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पहिली एफआयआर चुकीची होती, म्हणून दुसरी दाखल करण्यात आली. ज्या पोलीस अधिकाऱ्याने पहिली चुकीची एफआयआर नोंदवली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने झाला पाहिजे, आणि जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.


पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही धंगेकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, पोलीस आयुक्तांना सर्व काही माहित आहे; त्यांनी राजीनामा द्यावा. पुण्यातील लोक रस्त्यावर उतरले आहेत हे त्यांना कळावे म्हणून मी इथं आलो आहे.


इतर महत्वाच्या बातम्या