पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पुणे महापालिका अॅक्शन मोडवरील आली आहे आणि पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केली. त्यानंतर आता बार मालक आणि कामगारांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांनी पुण्यातील राजा बहादूर मिल येथे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहे. ज्या पबमध्ये फालतू धंदे चालतात ते पब बंद करा, सगळे पब बंद केलं तर घर कसं चालवायला पैसे कुठून आणणाार, ही कारवाई चुकीची असल्याच पबमध्ये काम करणाऱ्या महिलाबाऊंसर्स म्हणाल्या. 


पब बार रेस्टॉरंट चालक मालक कामगार  रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अत्यंत शांततेत आंदोलन करत आहेत. पुणे महापालिकेने जवळपा 50 रेस्टॉरंट जवळपास बंद केले आहेत. या सगळ्या पब आणि ह़ॉटेल्समध्ये साधारण अडीच हजार कामगार काम करतात. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुण्यातील प्रत्येकच बार मध्ये असे प्रकार चालक नाही उलट आम्ही सगळ्यांना मदत करतो त्यांची सुरक्षा करतो, असं महिला बाऊंसर्सने सांगितलं आहे. 


या घटनेमुळे आमच्यावर परिणाम  झाला आहे. सरसकट सगळ्या पबवर कारवाई करु नका, या पबमध्ये काम करतो. यावर आमचं पोट आहे, या मागणीसाठी चालक आणि कामगार आंदोलन करत आहेत. दोन बाराच्या चुकीमुळे सर्व इंडस्ट्रीला  हे भोगावे लागत असल्याचं आणि उपासमारीची वेळ येणार असल्याचंही ते म्हणाले.


अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील


कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत 32 विविध परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईत 10 रूफटॉप, अंदाजे 16 पब, इतर 6 परवाना कक्ष बार अशा एकूण 32 अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त,  उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून वारंवार अनुज्ञप्तींच्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्यात येते. कोझी बारवर आता  अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद केल्याची कारवाई केलेली असली तरी दोन महिन्यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय गुन्हा नोंद केलेला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Kalyani Nagar Pune Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, आरोपीच्या वडिल-आजोबांच्या जबाबात तफावत, पालकांसह पोलिसांचीही चौकशी होणार


Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला