Pune Porsche Accident Updates : पुणे : पुणे अपघात प्रकरणी (Pune Accident News Updates) धनिकपुत्रानं दोन इंजिनिअर्सना आपल्या महागड्या पोर्शे कारनं चिरडलं. त्यावेळी धनिकपुत्र असलेल्या अल्पवयीन आरोपीवर पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई, त्यानंतर त्याला मिळालेला जामीन यावरुन हे प्रकरण केवळ राज्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात गाजलं. आता याच अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आपल्या लाडावलेल्या बाळाला वाचवण्यासाठी प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालनं कुठपर्यंतची पातळी गाठली याचे अत्यंत धक्कादायक खुलासे याप्रकरणी होत आहेत. अशातच अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या धनिकपुत्राच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, हे रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून त्याबदली दुसऱ्याच तरुणाच्या रक्ताचे नमुने त्याच्या जागी ठेवल्याचं कृत्य ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी केलं. दोघांनाही गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यासोबतच ससूनमधीलच शिपाई अमित घटकांबळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 


पुणे ससून हॉस्पिटल प्रकरणी गुन्हे शाखेकडून पकडलेल्या डॉ. अजय तावरे, डॉ.श्रीहरी हळणोर आणि शिपाई अमित घटकांबळे यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अतुल घटकांबळे याच्याकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 50 हजार रुपये जप्त केले, तर दुसऱ्या बाजूला डॉ. श्रीहरी हळनोर यांच्याकडून 2.5 लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आता ही रक्कम कोणी घटकांबळेला कोणी दिली? याचा शोध सुरू आहे. 


घटकांबळेनं घेतलेले 50 हजार शेजाऱ्यांकडून जुप्त 


पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससून रूग्णालयाचे दोन डॉक्टर्स आणि शिपाई यांची कसून चौकशी केली जात आहे. डॉ. अजय तावरे, डॉ.श्रीहरी हळणोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची सखोल चौकशी सुरू आहे. अतुल घटकांबळेकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 50 हजार रुपये जप्त केले तर डॉ श्रीहरी हळनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये जप्त करण्यात आलेत. आता ही रक्कम कोणी घट कांबळे याला दिली याचा शोध सुरू आहे. या तिन्ही आरोपींनी 30 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


पोलीसी खाक्या दाखवल्यावर दोन्ही डॉक्टरांकडून गुन्ह्याची कबुली 


पुणे अपघात प्रकरणी ससुनमधील ज्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलंय, ते दोघेही सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देत नव्हते, मात्र, पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला आणि दोघांनी भडाभडा सगळं सांगायला सुरुवात केली. पोलिसांनी फैलावर घेताच डॉ. हळनोरनं आपल्या लाडोबाला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असलेल्या बिल्डर विशाल अग्रवालकडून तब्बल तीन लाख रुपयांची लाख घेऊन रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याची कबुली दिली. पण, दुसरा डॉक्टर तावरेनं यासाठी किती पैसे घेतले, हे अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. तर दोन डॉक्टरांसोबतच एका शिपायालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या शिपायाच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी या शिपायानं त्याला मिळालेले पैसे शेजाऱ्यांकडे ठेवायला दिल्याची बाब समोर आली आहे.