पुणे :  पुण्यात दारुड्या पोरानं दोघांचे बळी (Pune Accident)  घेतल्याच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असताना आता ससून रूग्णालयाच्या दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय. पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट (Blood Report) खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह असेल तरच अग्रवालच्या दिवट्याविरुद्ध खटला मजबूत होणार आहे. कदाचित याची कल्पना अग्रवाल कुटुंबियांनी होती म्हणूनन लेकाला वाचवण्यासासाठी वडिलांनी प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. ब्लड सँपल बदलण्यासाठी विशाल अग्रवालने (Vishal Agrawal)  डॉक्टरांना पैशाचे आमिष दिले.  लाडोबाचे वडिल  विशाल अग्रवालच्या फोनवर डॉक्टर अजय तावरेचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला होता. 


 ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी लाडोबाचे वडिल विशाल अग्रवालला अटक होण्याची शक्यता आहे.  विशाल अग्रवाल विरोधात आणखी एक प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. विशाल अग्रवालने अजय तावरे याला फोन  केले होते. पोलिसांना या विषयी चौकशी करायची आहे. 


दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात


पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटीव असेल तरच अगरवालचा दिवट्याविरुद्ध खटला मजबूत होणार आहे. कदाचित याची कल्पना अग्रवाल कुटुंबियांनी होती म्हणून  त्याला वाचवण्यासाठी कुटुंबीयांच्या तालावर  संपूर्ण यंत्रणा कामाला लागला होती.  11 वाजल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा रिपोर्ट आला.  त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले. खबरदारी म्हणून दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आली.


दोन्ही डॉक्टरांना राहत्या घरातून अटक


औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पाठवण्यात आले. औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आलं मात्र पहिले रक्ताचे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आले. पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळनोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितलंय. पुणे पोलिसांनी अखेर रात्री उशिरा दोघांना राहत्या घरातून अटक केलीय. 


डीएनए टेस्टिंग केल्यावर बिंग फुटलं 


 ब्लड सँपल बदलल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हरलोल असं त्यांचं नाव आहे. अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणलं असता सँपल बदलण्यात आलं. पुणे पोलिसांनी इतर लॅबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर बिंग फुटलं.


Pune Car Accident Blood Sample:



हे ही वाचा :


Pune Accident : धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने फेकून दिले, दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला, ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश