पुणेपुण्यातील कल्याणीनगरमध्ये (Pune Porsche Car Accident)  घडलेल्या अपघातानंतर आरटीओने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आलिशान पोर्श कारची तात्पुरती नोंदणी रद्द करण्यात आलीय. कारची तात्पुरती नोंदणी 18 मार्चला झाली होती. पुण्यातीस आरटीओमध्ये कारच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी 1 हजार 758 रुपयांची रक्कम न भरल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता या कारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार आहे. कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील 12 महिने नोंदणी करता येणार नाही.


या नोंदणीची मुदत 17  सप्टेंबरपर्यंत वैध आहे. ही कार पुण्यात आल्यानंतर 18 एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. तिच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी 1 हजार 758 रुपयांची रक्कम न भरल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता या कारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार आहे. कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील  12 महिने नोंदणी करता येणार नाही.


शुल्क भरले गेले नाही, म्हणून नोंदणी रखडली


अपघातग्रस्त कार बंगळुरुच्या एका डीलरकडून आली आह, . या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी करण्यात  आली होती जी, 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती. नंतर 18 एप्रिल 2024 रोजी मालकाने कार पुण्यात आरटीओमध्ये नोंदणीसाठी आणली होती. येथे कारची तपासणी केली गेली आणि मंजुरीही देण्यात आली. मात्र याचे शुल्क भरले गेले नाही म्हणून कारसाठी नोंदणी क्रमांक जारी केला गेला नाही. 


काय आहे प्रकरण?


पुण्यातल्या कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचा जामीन अखेर बाल न्याय मंडळाने रद्द केला. बाल न्याय मंडळात काल आठ तासांहून अधिक वेळ सुनावणी झाली. या मुलाची आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी होणार आहे. तसंच मुलगा सज्ञान आहे की अल्पवयीन हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाईल. तोवर मुलाला बालसुधारगृहातच राहावं लागणार आहे. अपघातानंतर या मुलाला तातडीने मिळालेल्या जामिनानंतर प्रचंड रोष निर्माण झाला होता.  स्वतः गृहमंत्री फडणवीसांनी पुण्यात जात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली होती. मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया प्रकरणानंतरच्या सुधारित ऑर्डरनुसार आरोेपी अल्पवयीन असल्यास त्याला काही प्रकरणात सज्ञान आरोपीनुसार कारवाई करता येते हा मुद्दा पोलिसांनी कोर्टात मांडला.


हे ही वाचा :


अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं, म्हणाल्या, शेम ऑन Juvenile Justice Board!