Ravindra Dhangekar On BJP : अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदसत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या या निर्णयावरुन राजकीय पक्षातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार असलेले रविंद्र धंगेकरांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप महासत्ता नाही तर भाजप कमकुवत असल्याचं धंगेकर म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


रविंद्र धंगेरकर म्हणाले की, भाजप ज्या पद्धतीने स्वत:ला महासत्ता समजते आणि त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते लागत आहेत. म्हणजेच भाजप आता महासत्ता नाही तर कमकुवत पार्टी झाली आहे. या सगळ्या बाहेरच्या नेत्यांशिवाय भाजप पुढे पावलं टाकू शकणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा आदर्श नेता भाजपात घेऊन चालले आहेत.


काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली तरीही कॉंग्रेसला फरक पडला नाही!


भाजपचे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यात फक्त 10 लोकांना मंत्रीपद मिळालं आहे. 90 लोक अजूनही मंत्रीपदाची वाट बघत आहे. काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली तरीही कॉंग्रेसला फरक पडला नाही. काँग्रेसचा इतिहास पाहिला तर अनेकदा काँंग्रेसमध्ये फूट पडली आहे. मात्र तेवढ्याच ताकदीने पुन्हा उभी राहिली आहे. त्यासोबत कॉंग्रेसचा कार्यकर्तादेखील ताकदीने उभा आहे. एखादा नेता गेला म्हणजे मतदार जात नाही. मतचदार हा राजा आहे. नेता गेला म्हणजे जनता गेली असं आजपर्यंत कधी झालं नाही, असंही ते म्हणाले आहेत. 


फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण ते उपमुख्यमंत्री झाले!


अशोक चव्हाणांसोबत आणखी काही नेते भाजपात जाण्याची शक्यता आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर बोलताना धंगेकरांनी चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले, आगे आगे भाजपचं काय होतं. ते त्यांनी बघायला हवं. फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण ते उपमुख्यमंत्री झाले. येत्या काही दिवसांत त्यापेक्षा खालचं पद त्यांना मिळू शकतं. त्यामुळे पुढे त्यांनाच मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


भाजपमध्ये गेल्यावर सन्मान मिळत नाही!


कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांना फोडायचं आणि त्यांना मोठी पदं द्यायची. याचा अर्थ भाजप आता कमकुवत होत आहे. कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये गेल्यावर आलबेल राहणार नाही तर तर तिसऱ्या रांगेत राहणार आहे. भाजपमध्ये गेल्यावर त्यांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप त्यांनी  केला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune-Mumbai Expressway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; वेळ पाहा आणि मग प्रवास करा!