पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha Constituency) प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी मराठा आंदोलकांना दिला होता. यातून मराठा लोकांच्या मतदानाची ताकद दाखवून द्या, असंही ते म्हणाले होते. प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार, याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच पुण्यातील काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरेंनी (Vasant More) महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्यानंतर आता त्यांनी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत काही प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. ही बैठक झाल्यानंतर वसंत मोरे तडकाफडकी निघून गेल्याचं दिसून आलं.
नेमकं काय घडलं?
वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रवींद्र धंगेकरांचीदेखील भेट घेतली. पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं वारंवार बोलून दाखवलं. मात्र महाविकास आघाडीकडून रवींंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली . त्यानंतर वसंत मोरेंनी डाव साधला आणि थेट मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे तिसरे उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पत्रकारांनी वसंत मोरेंना घेरलं आणि त्यांना पुण्यातून मराठा समाजाचे उमेदवार तुम्ही असणार का?, असा प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र बैठकीमधील बाकी कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांना हटकलं आणि वसंत मोरेंना विचारलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा प्रयत्न केला. हे सगळं पाहून वसंत मोरे चिडले आणि तडकाफडकी निघून गेले.
मराठे वसंत मोरेंना पाठिंबा देणार का?
पुण्यात लोकसभेची निवडणूकीसाठी सुरुवातीला महायुतीकडून मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ही लढत एकहाती होण्याची दाट शक्यता होती. मात्र त्यांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराची महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु होती. त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर करण्यात आलं. या दरम्यान वसंत मोरे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे आणि पुण्यात यंदा वेगळा प्रयोग पाहायाल मिळेल, असं म्हटलं होतं. वसंत मोरे हे नगरसेवक असले तरी पुण्यात त्यांचे नाव सर्वांना परिचित आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा असते. सोशल मीडियावरदेखील ते प्रसिद्ध आहेत. या बैठकीत हजेरी लावल्यामुळे वसंत मोरे मराठा समाजाकडून उमेदवार म्हणून समोर येतात का? आणि मराठे त्यांना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-