पुणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India)  राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात  (ajit Pawar) आलं. त्यानंतर शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे पक्षाचं नाव मिळालं.  यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. येत्या काळात पक्षाची कामगिरी कशी असेल किंवा पुण्यातील चित्र कसं असेल?, पक्षातील कार्यकर्ते कशापद्धतीने काम करतील आणि अर्थात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, यासंदर्भातील सगळा प्लॅन सांगितला आहे. हडपसर मतदारसंघात मेळावा होत आहे. या मेळाव्यात त्यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचा आगामी प्लॅन सांगितला आहे. 


जयंत पाटील हे कार्यकर्त्यांना सूचना देताना म्हणाले की, गेल्या काही दिवसात जे काही घडलंय हे आपणा सर्वांना माहित  आहे. त्यामुळे आता नव्याने लढायला सुरूवात करत आहोत. सगळ्यांना बुथ कमिट्यावर काम करायचं आहे. पक्षाचं काहीही झालं असलं तरीही अनेक लोक आपल्यासोबत आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने काम केलं चांगलाच निकाल मिळेल.


 हडपसरचा उमेदवार जाहीर करुन टाकला?


सध्या आगामी निवडणुकीसाठी अनेकजण तयारी करत आहे. त्यात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केला आहे. ते म्हणाले की प्रशांत जगताप हडपसरमधून आरामात निवडून येऊ शकतात. प्रशांत जगताप यांच्या नामाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.  गेल्या निवडणुकीत अवघ्या चेतन तुपे 2700 मतांनी निवडून आले तरीही ते अजित पवारांसोबत गेलेत. आता त्यांना भाजप कसं हे ते कळेल, अशीटी टीका त्यांनी तुपे यांच्यावर केली आहे. 


महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेलाय?


देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले की,  सध्या राज्यातील राजकारणात काय सुरु आहे हे सगळं आपण पाहत आहोत. गुन्हेगारी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आपण महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे, असं म्हणत होतो. मात्र आता महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला म्हणायची वेळ आली आहे. राज्यात घडत असलेल्या घटना, राजकारण्यांची टीका, एकमेकांवर ओढण्यात येणारे ताशेरे पाहूनदेखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यावर त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चुकीच्या गोष्टींवर गृहमंत्री म्हणून ते काहीतरी ठोस कारवाई करतील, अशी माझी अपेक्षा होती, मात्र तसं घडताना दिसत नसल्याचंही ते म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-

MNS Vasant More : "आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत'; स्टेटसमुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत; मनसेत इच्छुकांची गर्दी वाढली?